एकदातरी आयुष्यात प्रत्येकाने प्रेम करावे......
इन्द्रधानुश्याचे रंग वेड्यासारखे उगाच मोजावे
पक्ष्यांच्या पंखंवर बसून आकाशात उडावे
खिडकितुन बाहेर उगाच पाहावे
पावासंच्या सरी झेलत स्वताच्याच आसवात भिजावे
एकदातरी आयुष्यात प्रत्येकाने प्रेम करावे............
तिची आठवण म्हणजे पडलेली पहाटेची स्वप्ने
तिची आठवण म्हणजे वेड्यासारखे एकटेच हसने
तिची आठवण म्हणजे जागून काढलेली रात्र
तिची आठवण म्हणजे डोळ्यांचे ओले कड़े
एकदातरी आयुष्यात प्रत्येकाने प्रेम करावे............
कधीतरी गाणे एकटेच गुनगुनावे..काहीच करू नए असे वाटावे..
जगात फ़क्त ती अणि तिच दिसावी
अश्या स्वप्नांच्या राज्यात आपलेही एक घर असावे
कौलारू घराला प्रेमाचे तोरण असावे
एकदातरी आयुष्यात प्रत्येकाने प्रेम करावे............
नसलेले सत्य स्वतः अनुभवावे ..नास्तिक असुनही आस्तिक बनावे
जे दिसत नाही त्याची ओढ़ असावी..अणि प्रेमाच्या दुनियेत सगल्यानाच एंट्री असावी...
आता देवालाही नवा पेहेराव द्यावा...अणि गाभारयात चक्क तिचा चेहरा दिसावा...
हे असे एखाद्याबद्दल वाटने म्हणजेच प्रेम का ? प्रश्न कशाला ..याचे उत्तर स्वताहच शोधावे..
एकदातरी आयुष्यात प्रत्येकाने प्रेम करावे............
जसे फूल पुस्तकात साठवावे तशी जपावी तिची आठवण मनात
बरयाच वर्षांनी पाने उघडताना मग ती मिळेल...अणि गालावर हसू येईल...
कधी पूर्ण न झालेल ..ते भाबडे आपले स्वप्न..पुन्हा स्मरून..रडूही येईल...अणि मग हळूच पुस्तक बंद करावे...
एकदातरी आयुष्यात प्रत्येकाने प्रेम करावे............
Sunday, June 14, 2009
Subscribe to:
Comments (Atom)